सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरमध्ये रिव्होल्युशन सी.टी.एक्सपर्ट मशीन रुग्णांच्या सेवेसाठी २५ जानेवारी पासून सुरू..

सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरमध्ये रिव्होल्युशन सी.टी.एक्सपर्ट मशीन रुग्णांच्या सेवेसाठी २५ जानेवारी पासून सुरू..

कुडाळ /-

खाजगी आरोग्यक्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या कुडाळ येथील सिंधुदुर्ग रेडिऑलॉजी सेंटरने आपल्या 11 वर्षाच्या दमदार वाटचालीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अमेरिकन टेक्नॉलॉजीचे अद्ययावत रिव्होल्युशन सी टी एक्स्पर्ट (32 स्लाईस ) मशीन कार्यान्वित केले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा येत्या सोमवारी (ता 25) सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत रेडिओलॉजी सेंटरचे संचालक डॉ नंदन सामंत, सीए सुनिल सौदागर यांनी दिली.

सिंधुदुर्ग रेडिऑलॉजी सेंटरमध्ये प्रथमच अमेरिकन टेक्नॉलॉजी अद्ययावत रिव्होल्यूशन सिटी मशीन एक्सपर्ट कार्यान्वित केले आहे याबाबत आज येथील हॉटेल स्पाईस कोकण मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.यावेळी अँड मिहीर भणगे पण उपस्थित होते.

यावेळी बोलताना सीए सुनिल सौदागर म्हणाले दहा वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरमार्फत कुडाळ येथे विविध सेवा कार्यान्वित करण्यात आल्या. विशेष म्हणजे आरोग्य क्षेत्रात अद्ययावत सुविधा नसल्याने येथील लोकांना नवीन तंत्रज्ञानानुसार आरोग्यसुविधा देता यावी या अनुषंगाने माझ्यासह संचालक डॉ नंदन सामंत, अँड अजित भणगे, डॉ अजय स्वार, डॉ विवेक रेडकर अशा आम्ही पाच जणांनी हे सेंटर सुरू केले. यासाठी सर्व स्तरावर सर्वांचे उत्तम सहकार्य मिळाले. आधुनिक तंत्रज्ञानात वाटचाल करताना आम्ही सर्वांच्या सहकार्याने आरोग्य क्षेत्रात यशस्वी वाटचालीनंतर एम आर आय मशीन 2019 मध्ये या ठिकाणी सुरू करून येथील रुग्णांना सेवा देण्याचे काम करण्यात आले. यासाठी सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगून गेल्या दहा वर्षात दीड ते दोन लाख लोकांपर्यंत ही सेवा गेल्याचे त्यांनी सांगितले. डॉ सामंत म्हणाले आजच्या संगणीकृत युगात वाटचाल करताना अनेक झपाटयाने बदल होत आहेत.

बदलत्या परिस्थितीला सामोरे जाताना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी ही सेवा सुरू केली. याठिकाणी अकरा वर्षाच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर मैत्री पार्क येथे रिव्होल्युशन सी टी एक्स्पर्ट कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचा औपचारिक उद्घाटन सोहळा सोमवारी ता 25 रोजी सायंकाळी पाच वाजता माजी पालकमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण, कुडाळ नगरपचायत नगराध्यक्ष ओंकार तेली तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

_रिव्होल्यूशन सिटी एक्सपर्ट (32 स्लाईस ) रिव्होल्यूशन सिटी एक्सपर्ट (32 स्लाईस )ही अमेरिकन टेक्नॉलॉजी मशीन विशेष म्हणजे सिंधुदुर्गात प्रथमच कार्यान्वित होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ही मशीन नाही. या मशीनची पेरीफेरल अँजिओग्राफी, वेगवान व सूक्ष्म स्तरावर परीक्षण, कमीतकमी रेडिएशन एक्स्पोजर ही खास वैशिष्ट्य असल्याचे डॉ सामंत श्री सौदागर यांनी पत्रकार परिषदेत यावेळी सांगितले._

अभिप्राय द्या..