कुडाळ /-

शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कुडाळ पाट येथील अल्पेश घारे या यूवा चिञकाराने अनोखी मानवंदना दिली आहे .अल्पेशने निवतीच्या विस्तीर्ण समुद्र किना-यावर 30 फुटाच्या चौरसात बाळासाहेबांचे भले मोठे चिञ साकारले आहे. किणा-यावरील वाळू आणि रांगोळीचा वापर करून हूबेहूब चिञ साकारून बाळासाहेबांना अनोखी मानवंदना दिली आहे.

23 जानेवारी मराठी मातीशी नाते घट्ट करणारा दिवस .यापुढे हा दिवस उजाडणार तो पूर्वेच्या भगव्या क्षितीज्यावर बाळासाहेबांचे नाव कोरून. एक कलाकार म्हणून बाळासाहेबांचे जे दर्शन होते ते सामान्य कलाकाराला खूप भावते .हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सर्वांच्या मनात, स्पंदनात, हृदयात आजही अमर आहेत .त्यांनां मानवंदना देण्याकरिता या कलाकृतीची अल्पेश याने निर्मिती केली आहे .कलाकार वेगवेगळ्या क्लुप्त्या करून कलाकृती साकार करीत असतो .पण अल्पेश घारे या कलाकाराने एका कलाकाराला आगळीवेगळी मानवंदना दिली आहे .वाळू आणि रांगोळी या नाविन्यपूर्ण माध्यमाचा त्याकरिता वापर केला आहे .विशेष म्हणजे शूटिंग करण्यासाठी ड्रोनचा वापर केलेला नाही, ३० फुटाच्या चौरसात चित्र साकारले आहे.या चित्राचे आमदार, खासदार यानीही कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page