मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २८जानेवारीला…

मालवण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत २८जानेवारीला…

मालवण /-

ग्रामपंचायतीच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता शासनाच्या ग्रामविकास विभागाने सरपंच आरक्षण निश्चित केले आहे. यात तालुक्यासाठी निश्चित केलेली सरपंचांची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहित पद्धतीने निश्चित करण्यासाठी प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण सोडत २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात काढण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली.
तालुक्यात ६५ ग्रामपंचायती आहेत. सन २०११ ची लोकसंख्या ९३ हजार १५९ आहे. अनुसुचित जातीची लोकसंख्या ७०१५, अनुसुचित जमातीची लोकसंख्या ७८५ एवढी आहे. अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे प्रवर्ग ३, महिला २, अनुसुचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे प्रवर्ग १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे प्रवर्ग ९, महिला ९, खुला प्रवर्ग- प्रवर्ग २०, महिला २१ अशी पदे निश्चित केलेली आहेत.
मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणारा सरपंच सोडतीचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून पार पडणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी प्रवर्गनिहाय सरपंच पद आरक्षण निश्चितीस उपस्थित राहावे असे आवाहन मालवण तहसीलदार श्री. पाटणे यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..