शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या कुडाळ पंचायत समितीत साजरी होणार..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या कुडाळ पंचायत समितीत साजरी होणार..

कुडाळ /-

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला साजरी होणार आहे. राष्ट्रपुरुष/ थोर व्यक्ती यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याबाबतच्या शासननिर्णया नुसार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उद्या शनिवार 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ पंचायत समिती सभागृहात साजरी करण्यात येणार आहे.यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती कुडाळ पं.स.चे उपसभापती जयभारत पालव यांनी मीडिया शी बोलताना दिली आहे.

अभिप्राय द्या..