कुडाळ गांजा तस्करी प्रकरणातील संशयिताच्या मुसक्या कुडाळ पोलिसांनी आवळल्या..

कुडाळ गांजा तस्करी प्रकरणातील संशयिताच्या मुसक्या कुडाळ पोलिसांनी आवळल्या..

कुडाळ /-

कुडाळ गांजा तस्करी प्रकरणी अखेर फरारी संशयित आरोपी संकेत महेंद्रकरला पोलीससांनी त्यांच्या मुसक्या आवळत पहाटे गजाआड केले आहे.अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली आहे.वरवडे फणसवाडी येथून त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे.

गेले कित्येक दिवस संकेत मिलिंद महेंद्रकर हा फरार होत पोलीसांना हुलकावणी देत होता.महेंद्रकरच्या अटकेमुळे गांजा व्यावसायाच्यख मुळाशी जाण्याचा मार्ग पोलीसांना सोपा होणार आहे. चलाख महेंद्रकर मात्र ताकासतछर लागू देत नाही.आपणास गांजा ओढण्याची सवय आहे. आपण प्रवीण पवार कडून माल मिळवतो, अशी माहिती त्याने पोलीसांना दिली आहे.

१७ डिसेंबर २०२० मध्ये गांजा बाळगल्याप्रकरणी अरविंद अडसुळे व ताबीश जहांगी नाईक या दोघांना अटक करण्यात आली. मिळालेल्या माहिती नुसार कारवाईत पोलीस हेड काँ. फोंडेकर, राऊळ, मळगावकर, झोरे आदी सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..