वेंगुर्ला /-
वेंगुर्ले येथे होणाऱ्या बॅ. नाथ पै कम्युनिटी सेंटरसाठी दहा गुंठे जागा उपलब्ध करून देण्याचे आज झालेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले.
वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली.यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,तुषार सापळे,धर्मराज कांबळी,प्रशांत आपटे,नागेश गावडे,श्रेया मयेकर,साक्षी पेडणेकर,दादा सोकटे, विधाता सावंत,प्रकाश डिचोलकर,पुनम जाधव,कृतिका कुबल,शितल आंगचेकर, सुमन निकम,कृपा गिरप – मोंडकर, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल,तसेच पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी सफर वेंगुर्लेची या युट्युब मालिकेच्या दोन भागांसाठी आर्थिक सहकार्य करण्याचे ठरले. यावेळी वेंगुर्ले शहरातील सर्व कॉम्प्लेक्समध्ये एसटीपी प्लांट कार्यान्वित न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरले.वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाने दिलेल्या पत्रावर यावेळी चर्चा करण्यात येऊन त्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचे ठरले.शासन निर्णयानुसार न.प.मध्ये २५ वर्षे सेवा बजाविलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना घरे देण्याचे ठरले.नगरसेवक विधाता सावंत यांनी शहरातील प्लॅस्टिक वाढीबाबत जनजागृती तसेच सुयोग्य नियोजन करण्यात यावे,हॉस्पिटल नाका येथील ट्रॅफिक जाम समस्याबाबत व इतर महत्वाच्या मुद्यांवर आक्रमक सूचना मांडल्या.कृतिका कुबल यांनी नातू व्हाळी ब्रिजची उंची वाढविण्याबाबत सुचना मांडली.स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा मोहिमेच्या दृष्टीने शहरात भित्तिचित्रे रंगविण्याबाबत नगरसेवक प्रशांत आपटे यांनी सूचना मांडली.यावेळी कॅम्प स्टेडियमच्या बाजूचा कठडा व घोडेबाव गार्डन आदी ठिकाणी भित्तिचित्रे रंगविण्या त यावी,असे ठरविण्यात आले.दरम्यान सुंदरभाटले येथील गटार कामाबाबत सुमन निकम यांनी विरोध व्यक्त केला.या सभेत सुहास गवंडळकर,तुषार सापळे,श्रेया मयेकर, दादा सोकटे,शितल आंगचेकर, प्रकाश डिचोलकर,सुमन निकम,नागेश गावडे आदींनी विविध विविध मुद्यांवर सूचना मांडल्या. दरम्यान न.प.मार्फत सर्व नगरसेवकांची कामे वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार,असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले.दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या मोहिमेंतर्गत होणाऱ्या चित्रकला, निबंध,वक्तृत्व, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना २६ जानेवारी रोजी सकाळी ९ वा.बक्षिस वितरण कार्यक्रम होणार आहे.तसेच न.प.च्या वतीने पत्रकार दिपेश परब,पत्रकार आबा खवणेकर, कवीशर करलकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.