कुडाळ शहरातील मच्छीमार्केट मंडपशेडचे मच्छी विक्रेत्या यांच्याच हस्ते झाले उद्घाटन.;नगराध्यक्ष ओंकार यांनी दाखवला मनाचा मोठेपणा

कुडाळ शहरातील मच्छीमार्केट मंडपशेडचे मच्छी विक्रेत्या यांच्याच हस्ते झाले उद्घाटन.;नगराध्यक्ष ओंकार यांनी दाखवला मनाचा मोठेपणा

जेष्ठ मच्छी विक्रेत्या एलिझा फर्नांडिस यांच्या हस्ते झाले फीत कापून उद्घाटन..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मच्छीमार्केट मंडप शेडचे आज दिनांक २२ जानेवारीला कुडाळ नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली,यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत चे नगरसेवक आणि जेष्ठ महिला मच्छी विक्रेत्या श्रीमती जेष्ठ मच्छी विक्रेत्या एलिझा फर्नांडिस यांच्या हस्ते झाले उद्घाटन करण्यात आले.कुडाळ शहरातील ही पहिलीच घटना आहे,की सत्कार मूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन न करता ईतरांच्या हस्ते उद्घाटन करणें. मच्छी विक्रेत्या यांच्याकडून फीत कापून घेणे,नगराध्यक्ष ओंकार यांनी आपला मनाचा मोठेपण| दाखवला आहे.सर्वचं नगरसेवक अलिप्त राहून मच्छी विक्रेत्या यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कुडाळ मच्छीमार्केट मंडपशेड उदघाटन प्रसंगी मच्छी विक्रेत्या ह्या मोठ्या संखेने उपस्थित होत्या.यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या सोबत नगरसेवक सुनील बांदेकर ,नगरसेवक आबा धडाम ,नगरसेवक राकेश कांदे , उपनगराध्यक्ष सौ.सायली मांजरेकर ,रामा मांजरेकर,नगरसेविका उषा आठले,नगरसेविका सौ.प्रज्ञा राणे,नगरसेविका सौ.साक्षी सावंत,नगरसेविका अस्विनी गावडे,कुडाळ सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट,शहर अध्यक्ष| ममता धुरी,सामाजिक कार्यकर्ते कान्हा केसरकर ,भाजपचे पदाधिकारी बंड्या सावंत, नगरसेवक जीवन बांदेकर, नगरसेवक सचिन काळप,राजवीर पाटील.अन्य कुडाळ मच्छीमार्केट परिसरातील व्यापारी वर्ग हा उपस्थित होता.

अभिप्राय द्या..