वेंगुर्ला /-
वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत वेंगुर्ले शहरातील शासकिय अधिकारी व कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यासाठी
दोन दिवशीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर साई दरबार हॉल येथे संपन्न झाले.या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन न.प.नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल,स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर,आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक रमेश मिश्रा, सतीश गिरप,दिनकर कांबळे, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात शहरी भागात आकस्मित निर्माण होणाऱ्या आपत्तीच्या घटनावेळी प्राथमिक स्वरूपात काय काय करता यावे, या संदर्भात कार्यक्रमांच्या सुरवातीस उपस्थित प्रशिक्षाणांर्थीकडून एक फॉर्म देवून व अशा घटनावेळी घ्यावयाची काळजी व मदत कार्यासंबधी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षकांनी जाणून घेतली. त्यानंतर आकस्मित आगीच्या, अपघाताच्या, पाण्याच्या पुराच्या व अन्य घटना घडल्यास आपण काय काय करावे. मदत कोणाकोणाला कळवून घ्यावी. ती मदत कशाप्रकारे करावी. जखमी झालेल्या व्यक्तींना तेथून उपचारासाठी गाडीपर्यत कसे न्यावे. याची प्रात्यक्षिके प्रशिक्षणार्थींना दाखविली.आगीपासून संरक्षणबाबत ची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.तसेच कर्मचाऱ्यांकडून वरील सर्व प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली.यावेळी कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून प्रशिक्षण शिबीर खूप फायदेशीर व गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक रमेश मिश्रा, सतिश गिरप,दिनकर कांबळे, प्रमोद जाधव यांचा वेंगुर्ले न.प.चे सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.या प्रशिक्षण शिबिरात सर्व न. प. अधिकारी व कर्मचारी, पोलीस, तसेच विविध शासकिय खात्यातील कर्मचारी उपस्थित होते.आभार स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी मानले.