नेपाळ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नानेली गावची कु.श्रावणी धुरी ची निवड

नेपाळ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नानेली गावची कु.श्रावणी धुरी ची निवड

महीला गटात महाराष्ट्रात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला

नॅशनल कबड्डी मॅच गोवा बानवली चर्च मैदान येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटांचा समावेश केला होता. ही स्पर्धा १५ ते १७ जानेवारी दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये तेलंगणा,कर्नाटक,महाराष्ट्र,हरियाणा,आंध्र प्रदेश, गुजरात,राज्यांचा समावेश होता. या स्पर्धेत महाराष्ट्राची ५५ खेळाडू सहभागी झाले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ मुलगे १ मुलगी सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये महिला गटात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अभिप्राय द्या..