वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत वर शिवसेना पुरस्कृत सागरतीर्थ गाव विकास पॅनेलने तर आरवली ग्रामपंचायतवर भाजपा पुरस्कृत आरवली गाव विकास पॅनेलने वर्चस्व मिळविले आहे.
तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली या दोन ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रिया आज सोमवारी १८ जानेवारी रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे पार पडली.यामध्ये सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर शिवसेनेने ५ जागांवर विजय मिळविला.तर आरवली ग्रामपंचायतीवर भाजपाने ५ जागांवर विजय मिळविला.वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली या २ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या होत्या.सागरतीर्थ ग्रामपंचायत येथे ३ प्रभागातील ८ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात होते.यामधून यापूर्वीच प्रभाग क्र.३ मधून समृद्धी संतोष कुडव या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या.येथे शिवसेनेचे वर्चस्व राखताना ४ जागांवर विजय मिळविला.१ सदस्य याअगोदरच बिनविरोध निवडून आल्याने येथे शिवसेनेचे ५ सदस्य निवडून आले आहेत.२ सदस्य काँगेस आघाडीचे,२ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.यामध्ये प्रभाग क्र.१ मधून प्रणय कमलाकर बागकर(अपक्ष),स्मिता बेनित फर्नांडीस(शिवसेना) व मेरी फ्रान्सिस फर्नांडीस(शिवसेना),प्रभाग क्र.२ मधून ज्ञानदेव श्रीधर चोपडेकर(शिवसेना),पांडुरंग सुरेश फोडनाईक(काँग्रेस),सुषमा राधाकृष्ण गोडकर(काँग्रेस),प्रभाग क्र.३ मधून एकनाथ शंकर कुडव(शिवसेना) व गायत्री स्वप्निल गोडकर (अपक्ष) इत्यादी उमेदवार विजयी झाले आहेत.आरवली ग्रामपंचायत येथे ३ प्रभागातील ९ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात होते.यामध्ये भाजपने आपले
वर्चस्व राखताना ५ जागांवर विजय मिळविला.३ जागांवर शिवसेनेचे उमेदवार व १ जागेवर काँगेस आघाडी सदस्य विजयी झाले आहेत.यामध्ये प्रभाग क्र.१ मधून प्रविण भाऊ मेस्त्री(काँग्रेस आघाडी),समिर आनंद कांबळी (भाजपा),रिमा एकनाथ मेस्त्री(भाजपा),प्रभाग क्र.२ मधून किरण जनार्दन पालयेकर(शिवसेना),शिला बाळा जाधव(भाजपा),वैशाली विजय रेडकर(शिवसेना),प्रभाग क्र.३ मधून तातोबा भास्कर कुडव(भाजपा),सायली सत्यवान कुडव(भाजपा),अक्षता उदय नाईक(शिवसेना) इत्यादी सदस्य निवडून आले आहेत.विजयानंतर भाजपा – शिवसेना – काँग्रेस च्या पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.सागरतीर्थ ग्रा.प.वर भगवा फडकवल्यावर शिवसेना पदाधिकारी यांनी जल्लोष केला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,माजी सभापती सुनिल मोरजकर,शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकरउपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर,बाळा दळवी,सुनिल डुबळे,नगरसेविका सुमन निकम,महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले,मंजुषा आरोलकर,युवासेनेचे पंकज शिरसाट,सुयोग चेंदवणकर आदींसह पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
आरवली ग्रामपंचायतवर भाजपचे ५ सदस्य निवडून आल्यानंतर भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष केला.यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ,वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,वसंत तांडेल,नितिश कुडतरकर आदींसह भाजपा पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच काँग्रेस सदस्य निवडून आल्यानंतर काँग्रेस पदाधिकारीनी जल्लोष केला.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख,पं.स.उपसभापती सिद्धेश परब,माजी सभापती जगन्नाथ डोंगरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान सागरतीर्थ ग्रामपंचायत येथे ५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी जनतेच्या विश्वासाने हे यश मिळाले असून खासदार,पालकमंत्री, आमदार,जिल्हाप्रमुख यांच्या माध्यमातून गावच्या विकासात्मक कामांना प्राधान्य देण्यात येईल,असे सांगितले.तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी आरवली ग्रामस्थांनी भाजपावर विश्वास दर्शविल्याने ग्रा.प.वर भाजपचा झेंडा फडकला आहे.येथील कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार जनतेपर्यंत चांगल्या प्रकारे पोहचविले.आम्ही कार्यकर्त्यांसह आरवली गाव विकास कामांमध्ये अग्रेसर राहून कार्य करीत राहू,असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page