बॅ नाथ पै पुण्यतिथीचे औचित्य साधून परमानंद अर्जुन परब यांचा नाथ पै यांच्या नात अदिती पै यांच्या हस्ते सत्कार

बॅ नाथ पै पुण्यतिथीचे औचित्य साधून परमानंद अर्जुन परब यांचा नाथ पै यांच्या नात अदिती पै यांच्या हस्ते सत्कार

कुडाळ /-

कुडाळ बॅ नाथ पै यांचे शालेय जिवनातील सोबती पिंगुळि काळेपाणी येथील श्री परमानंद अर्जुन परब ९९ वर्षे यांचा आज बॅ नाथ पै पुण्यतिथीचे औचित्य साधून नाथ पै यांच्या नात अदिती पै यांच्या हस्ते विशेष सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला.

परमानंद परब यांचे वय ९९वर्षे असुन शंभर वर्षांत पदार्पण करीत असुन काल वेंगुर्ले येथे बॅ नाथ पै यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळयावेळी परमानंद परब यांचा विशेष उल्लेख खासदार विनायक राऊत यांनी यांनी केला होता यावेळी परब हे नाथ पै शिक्षण घेत असलेल्या शाळा नं १ तालुका स्कूल येथे शालेय सोबती म्हणुन पहीली ते तिसरी पर्यंत होते परब हे सध्या पिंगुळि काळेपाणी येथे आपल्या कुटुंबासमवेत रहात असून त्यांच्या निवासस्थानी जाऊन आज नाथ पै यांच्या नात अदीती पै, मिना तळपदे, जि प माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, शिवसेनेचे अतुल बंगे, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, डॉ भंडारी सर, यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला यावेळी परमानंद परब यांनी नाथ पै यांच्या आठवणी सांगुन डोळ्यात आनंदाश्रू आणले, यावेळी अदिती पै यांनी वेंगुर्ले येथे नाथांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याचे परब यांनी कौतुक करुन नाथांच्या आणवणींना उजाळा देत बॅ नाथ पै यांचे विचार आजही जिवंत आहेत यावेळी परमानंद परब यांचे चिरंजीव मुरलीधर परब, श्रीधर परब, कमलाकर परब, युवासेना वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..