राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून आज कुडाळमद्धे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांचा गौरव कार्यक्रम संपन्न..

राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून आज कुडाळमद्धे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांचा गौरव कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /-

आज १२ जानेवारी २०२१ रोजी राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून भाजपा महिला मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे सायंकाळी कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात जिल्ह्यातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय सौ. निलमताई नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त महिला या पुढील प्रमाणे आहेत.सौ.अदिती भूषण बोडस – पडेल,सौ.रंजना रामचंद्र कदम -देवगड ,सौ.सुप्रिया समीर पाटील -कणकवली, सौ.निशा भास्कर गुरव -ग्रामीण ,सौ.जोती गावकर ,सौ.रेश्मा गुरुनाथ सावंत -टेंडोली ,सौ.प्रिया पांचाळ -पिंगुळी ,सौ.श्रद्धा केळुसकर -मालवण ,सौ.रुचिता नार्वेकर -मालवण ,नेत्रा मूळे-सावंतवाडी ,सौ.सुजल सूर्यकांत गवस -दोडामार्ग ,सौ.सुजाता देसाई -वेंगुर्ला. या सर्व महिलांना आज सौ.निलमताई राणे यांच्या हस्ते भाजपच्या वतीने गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष| सौ. संध्या प्रसाद तेरसे ,जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्ष| सौ.समिधा नाईक,कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नूतन आईर, सौ.
सावी लोके, सौ.अस्मिता बांदेकर अन्य महिला उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..