आरोग्य शिबिराचा घेतला १५० जणांनी लाभ..

मसुरे /-

पडवे येथील एस. एस. पी. एम. लाईफ टाईम हॉस्पिटलच्या माध्यमातून कांदळगाव मध्ये आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांचे तसेच ईतर आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

यावेळी सरपंच सौ. उमदी उदय परब, उपसरपंच आनंद आयकर, माजी सभापती उदय परब, सदस्या सौ माधवी कदम, सौ श्रद्धा कुंभार, ग्रामसेवक श्री देसाई, कर्मचारी गजानन सुर्वे, आशिष आचरेकर, माजी सरपंच बाबू राणे, सोसायटी चेअरमन लहू कदम, सिध्दार्थ कदम, सुशांत सुर्वे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आपल्या कारकीर्दीत सदर शिबीर दुसर्‍यांदा होत असुन लाईफ टाईम हॉस्पिटल आणि कांदळगावची एक नाळ जुळलेली आहे. त्यामुळे लाईफ टाईम हॉस्पिटलच्या सहकार्यातून आयोजित आरोग्य शिबिराचा कांदळगाववासियांना नक्कीच फायदा होत आहे. सरपंच सौ परब यांच्याकडून डॉ मृदुला महाडिक, डॉ सुधीर सांभारे,डॉ अश्विन साठे, जनसंपर्क अधिकारी हरिश्चंद्र परब, वंदना कसालकर, अंकिता बिरमोळे, उदय मांजलकर आणि सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page