वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ,शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठाच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाऊंडेशनची शिष्यवृत्ती..

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ,शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठाच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाऊंडेशनची शिष्यवृत्ती..

कुडाळ /-

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठाच्या ७ मुलांना ग्लोबल फाऊंडेशन मुंबई या सेवाभावी ट्रस्टकडून प्रत्येकाला रु. ३ हजारची शिष्यवृत्ती मिळाली.
यामध्ये इ. ९ वी तील नारायण सावंत, मारुती सावंत, जागृती साळसकर, तेजस्वी जाधव, गौरव जाधव, पूजा झोरे व प्रभाकर अणावकर- ८ वी या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली.ग्लोबत फाऊंडेशन आणि आमची संस्था यांचे संबंध सुमारे २५ ते ३० वर्ष असून संस्थेला फार मोठे आर्थिक सहाय्य देत आहे. संस्था ग्लोबल फाऊंडेशनचे फार आभारी आहे. संस्थेचे स्थानिक व्यवस्थापक प्रसाद परब आणि त्यांचे सहकारी यांचेही आभार . शिष्यवृत्तीधारक मुलांचे संस्था व शाळेच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

अभिप्राय द्या..