विनय सावंत यांनीजखमी किंगफिशर पक्षाला दिले जिवदान

विनय सावंत यांनीजखमी किंगफिशर पक्षाला दिले जिवदान

आचरा-

आपल्या घराच्या आवारात जखमी अवस्थेत आढळलेल्या किंगफिशर पक्षाच्या पंखाला झालेल्या जखमेवर औषधोपचार करत आचरा देवूळवाडी येथील विनय सावंत यांनी त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले.

गुरुवारी सायंकाळी आचरा बाजारपेठ येथील आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या परीसरात घरातील मांजर शिकारीच्या प्रयत्नात असल्याचे विनय सावंत यांना दिसून आले.बारकाईने बघितल्यावर तेथे उडता येत नसलेला किंगफिशर पक्षी सावंत यांना दिसून आला त्याला पकडून पहाणी केल्यावर त्याच्या पंखाला जखम झाल्याचे सावंत यांना दिसून आले.त्याच्यावर उपचार करून शुक्रवारी सकाळी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.विनय सावंत यांच्या तत्परते मुळे किंगफिशर पक्षाला जिवदान मिळाले

अभिप्राय द्या..