कुडाळ एमआयडीसी परिसरात बिबट्या आला असल्याची खबर पसरताच शहरात खळबळ..

कुडाळ एमआयडीसी परिसरात बिबट्या आला असल्याची खबर पसरताच शहरात खळबळ..

कुडाळ /-

कुडाळ एमआयडीसी परिसरात बिबट्या आला असल्याची खबर पसरताच येथील परिसरात एकच खळबळ उडाली.याबाबत पोलिस प्रशासन व वनविभागाला कळताच वनविभागाने तात्काळ योग्य ती माहिती घेत सदरचा तो प्राणी बिबट्या नसून तमे रानमांजर होते असे जाहीर करताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.गुरुवारी उशिरा कुडाळ एमआयडीसी येथील कौल फॅक्टरी जवळील परिसरात कुत्रे मोठमोठ्याने भुंकत होते.त्या कुत्र्यांनी एका रानटी प्राण्याला अडवुन ठेवले होते.व तो प्राणी लहान बिबट्या सारखा दिसत होता व हे तेथील काही जणांनी पाहिले,त्यामुळे कुडाळ एम.आय.डीसी परिसरात बिबट्याची एकाच खळबळ उडाली होती.

काही महिन्यांपूर्वीच पिंगुळी, गोवरी, वाडीवरवडे माड्याचीवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्या फिरताना आढळून आले होते.काही बिबट्यानी तर येतील पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना भक्षस्थानी पाडल्याची घटना घडल्या.त्यामुळे सदरील प्राणी हा ही बिबट्याच असेल असा समज झाला व एमआयडीसी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्या घुसला ही बातमी या परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली.याबाबत काहीनी कुडाळ पोलीस ठाणे व वन,विभागालाही कळविले.वन विभागाने तात्काळ याची दखल घेत अधिक माहिती घेतली असता सदर तो बिबट्या नसून ते रान मांजर होते अशी माहिती सर्वांना कळवली व त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

अभिप्राय द्या..