पावशी घावनळे फाटा येथील बॉक्सवेलचे काम पुर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आ.वैभव नाईक यांना निवेदन..

पावशी घावनळे फाटा येथील बॉक्सवेलचे काम पुर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आ.वैभव नाईक यांना निवेदन..

कुडाळ /-

पावशी घावनळे फाटा येथील बॉक्सवेल येथुन बॉक्सवेलचे काम पुर्ण करुन घावनळेकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तात्काळ करणेत यावा अन्यथा या पंचक्रोशीतील सर्व सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने विनंती येथील मार्गावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रसिध्दी पत्रकातुन आमदार श्री वैभवजी नाईक यांना देण्यात आला.सदरचे निवेदन पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, घावनळे उपसरपंच दिनेश वारंग, उपसरपंच दिपक आंगणे, विजय वारंग, हितेंद्र चव्हाण अमित पालव, बंड्या वारंग, प्रभाकर वारंग यांनी व पंचक्रोशीतील सर्व सरपंच व ग्रामस्थांनी आम नाईक यांना दिले.

या निवेदनात नमुद करण्यात आले की, पावशी महामार्गावर घावनळे फाटा येथील बॉक्सवेलाचे काम बरेच महिने अर्धवट स्थितीत असून पंचक्रोशीतील लोकांना कुडाळ मधुन येजा करण्यासाठी हायवेवरुन थेट रस्ता क्रॉस करावा लागतो. त्यामुळे वाहन धारकाना बराच मनस्ताप होत असून अपघात होण्याचा संभव आहे.

चार दिवसांपूर्वी रस्ता क्रॉस करीत असताना तुळसुली गावातील एका रिक्षा चालकाचा अपघात झाला.त्याचे नशीब चांगले म्हणून तो व त्याचा आठ वर्षाचा मुलगा सुदैवाने वाचले. अशी परिस्थिती पुन्हा उदभवु नये यासाठी तात्काळ बॉक्सवेलचे काम पुर्ण करुन घावनळेकडे जाणारा सुरक्षित मार्ग तात्काळ काढून द्यावा अन्यथा येथील मार्गावर पंचकोशीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..