कोकण बांबू व केन डेव्हलपमेंट सेंटर (कॉनबॅक) व जान्स बांबू प्रॉडक्स् प्रा. लि. यांच्या सहयोगाने १ ए, एम्.आय्.डी.सी. कुडाळ येथे उभारण्यात आलेल्या बांबू फर्निचर व हस्तकला दालनाचा भुभारंभ खासदार तथा शिवसेना गटनेते लोकसभा श्री. विनायक राऊत यांचे हस्ते करण्यात आला.जिल्ह्यात प्रथमच बांबूचे फर्निचर व हस्तकलेच्या कलात्मक वस्तुंचे हे फॅक्टरी आऊटलेट असून पिंगुळी नेरुर मालवण रोड येथील या दालनाचा पर्यटकांना आकर्षित करुन त्या योगे स्थानीक रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मोठा उपयोग होईल असा विश्वास खासदर राऊत यांनी व्यक्त केला आहे.या कार्यक्रमाला आमदार श्री. वैभवजी नाईक यांनी भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसा केली.यावेळी कॉनबॅकचे संचालक मोहन होडावडेकर, संजिव कर्षे यांनी कॉनबॅकच्या विविध,उपक्रमाची प्रत्यक्ष भेट घडवून माहिती दिली.
या कार्यक्रमास शिवराज्याभिषेक दिनोत्वस समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार, जिल्हापरिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब, तालुका प्रमुख राजन नाईक, महीला उद्योजक रुची राऊत, श्री. संतोष राणे वरिष्ठ व्यवस्थापक युनियन बॅक, जान्स बांबू संचालक कुणाल नेगांधी, कॉनबॅकचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.