सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने खोलले खाते..

सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने खोलले खाते..

मनसेचे डिंगणे शाखाध्यक्ष श्री आदेश सावंत यांचे गाव विकास पॅनल मधून बिनविरोध निवड..

सावंतवाडी/-

सावंतवाडी तालुक्यात लागलेल्या 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी डिंगणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यात मनसे ने पहिले खाते खोलले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डिंगणे शाखाध्यक्ष आदेश सावंत हे गाव विकास पॅनल मधून बिनविरोध निवडून आले आहेत.
सावंतवाडी तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकूण 11 ग्रामपंचायत च्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. यातील डिंगणे ग्रामपंचायत ची लागलेली निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले डिंगणे शाखाध्यक्ष आदेश सावंत यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. मनसे नेते व माजी आम परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढवत असून तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन निकाल लागण्यापूर्वीच मनसे ने सावंतवाडीत आपले खाते खोलले आहे. डिंगणे ग्रामपंचायत च्या गाव विकास पॅनल मधून निवडणूक रिंगणात असलेले आदेश सावंत हे बिनविरोध निवडून आले आहेत. या ग्राप च्या निवडणुकीत मनसेला या एका जागेमुळे सुरुवातीलाच यश मिळाले असून नूतन ग्राप सदस्य आदेश सावंत यांचे मनसे नेते जी जी उपरकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, डिंगणे विभाग अध्यक्ष नाना ॲड अनिल केसरकर ॲड राजू कासकर मनविसे जिल्हाध्यक्ष कुनाल किंनळेकर संतोष भैरवकर बांदा शहर अध्यक्ष बाळा बहिरे प्रसाद गावडे, राजेश टंगसासाळी,शुभम सावंत, ललिता नाईक, आकाश यांनी भिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..