सावंतवाडीतअंकुर महिला वसतिगृहात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

सावंतवाडीतअंकुर महिला वसतिगृहात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

सावंतवाडी /-

महिला बालविकास समिती व अदिती सामंत यांच्याकडून आज सावंतवाडी येथील अंकुर महिला वसतिगृहात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी समितीच्या वतीने तेथील महिलांना खाऊ आणि कपडे यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच यावेळी अदिंती सामंत हिच्यासह तेथील दोन महिलांचे जन्मदिवस देखील केक कापून साजरे करण्यात आले आहेत. यावेळी महिला बालविकास तक्रार निवारण समिती अध्यक्ष, सिंधुदुर्ग परिणीती वर्तक, अंकुर महिला वस्तीगृहाच्या अधिक्षिका रेश्मा पठाण, अदिती सामंत, पुनम वाडकर, वृषाली सावंत आदी महिला उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..