वायंगणी श्री देव डोंब चा आज जत्रोत्सव..

वायंगणी श्री देव डोंब चा आज जत्रोत्सव..

वेंगुर्ला /-

तालुक्यातील वायंगणी श्री देव डोंब देवस्थान वायंगणी चा वार्षिक जत्रोत्सव आज शनिवारी संपन्न होणार आहे.त्या निमित्त सकाळी ९:१५ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, तिर्थप्रासाद, रात्रौ १२ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्व भाविकानी मास्क,सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर याचा वापर करून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वायंगणी ग्रामस्थांनी केले आहे.

अभिप्राय द्या..