अमित सामंत यांच्या सहकार्यातून वालावल येथील त्या कुटूंबाची अंधकारमय जीवनातून प्रकाशमय जीवनाकडे वाटचाल सुरू..

अमित सामंत यांच्या सहकार्यातून वालावल येथील त्या कुटूंबाची अंधकारमय जीवनातून प्रकाशमय जीवनाकडे वाटचाल सुरू..

कुडाळ /-

वालावल येथील श्री कृष्णा अर्जुन चौधरी कुटुंब गेली अकरा वर्षे करत असलेला अंधकारमय प्रवासाची हकिकत वालावल येथील स्थानिक कार्यकर्ते दाजी कावळे भीसाजी वालावलकर प्रशांत पाताडे सचिन पाटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली.आणि अमित सामंत यांनी कोणताही विचार न करता त्या कुटूंबाला न्याय देण्याचा निर्णय घेतला.आणि त्वरित त्या कुटुंबाला प्रकाशमय जीवनाकडे नेण्याचा निर्णय घेऊन तात्काळ सौरऊर्जेवर चालणारी लाईट त्या कुटुंबाला पुरविली.आणी त्या कुटुंबाचा प्रवास सुरू झाला प्रकाशमय दिशेने.आणि गेली अकरा वर्षे असलेला अंधकार दुर झाला.त्याचप्रमाणे दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या त्यांच्या मुली पुढिल शैक्षणिक समस्याही दूर झाली. याचे सर्व श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांचे असून हे प्रयत्न आम्ही कधीही विसरणार नाही. असे घर मालक श्री कृष्णा अर्जुन चौधरी व कुटुंबीयांनी सांगितले.

कुटुंबाच्या चेहर्‍यावर हास्य..

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रयत्नातून तब्बल बारा वर्षानंतर आपल्या घरात लाईट पेटल्याचे दिसताच संपूर्ण कुटुंब हर्षभरीत होऊन आपल्यामुलीच्या मुख्य शैक्षणिक अडचणी दूर झाल्याचे समाधान त्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होत्या.

अभिप्राय द्या..