कुडाळ तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर.;उमेश तोरसकर, गुरु दळवी ,समीर म्हाडगूत यांचा सामावेश.

कुडाळ तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर.;उमेश तोरसकर, गुरु दळवी ,समीर म्हाडगूत यांचा सामावेश.

कुडाळ/-

तालुका पत्रकार समितीचे व्याधकार ग .म .भय्यासाहेब वालावलकर जिल्हा स्तरीय पत्रकार पुरस्कार उमेश तोरसकर छायाचित्र पुरस्कार समीर म्हाडगुत कै वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार गुरुप्रसाद दळवी यांना जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराचे वितरण भय्यासाहेब वालावलकर यांच्या स्मृतिदिनी 16 फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता समर्थ अँग्रो एकांत रिसॉर्ट पिंगुळी येथे करण्यात येणार आहे

कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने दरवर्षी ग म तथा भय्यासाहेब वालावलकर यांच्या नावाने जिल्हा पत्रकार पुरस्कार व जिल्हा छायाचित्र पुरस्कार दिला जातो तर कै वसंत दळवी स्मृती नावाने ग्रामीण पुरस्कार हा ग्रामीण भागातील पत्रकाराला देण्यात येतो पुरस्कार वितरण सोहळा व नियोजनाची बैठक एमआयडिसी विश्रामगृहावर कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्ष विजय पालकर व जिल्हा पत्रकार संघाचे सचिव उमेश तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी खजिनदार अजय सावंत उपादक्ष आनंद मर्गज निलेश तेडोलकर दीपक तारी उपस्थित होते या बैठकीत सन 2020 -21 चा ग म तथा भय्यासाहेब वालावलकर जिल्हा पत्रकार पुरस्कार कुडाळ येथील ज्येष्ठ पत्रकार उमेश तोरसकर यांना जाहीर झाला आहे श्री तोरसकर हे गेली कित्येक वर्ष पत्रकारितेत कार्यरत आहेत सध्या ते कोंकणसाद मध्ये कार्यरत आहेत तसेच जिल्हा पत्रकार संघाचे सचिव आहेत छायाचित्र पुरस्कार मालवण येथील समीर म्हाडगुत यांना देण्यात येणार आहे ते फोटोग्राफी क्षेत्रात बरीच वर्षे कार्यरत आहेत सिंधुदुर्ग लाईव्ह चे पणदूर येथील गुरुप्रसाद दळवी यांना ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्काराचे वितरण 16 फेब्रुवारीला भय्यासाहेब वालावलकर यांच्या स्मृतीदिनी सकाळी साडेदहा वाजता माजी जि प उपादक्ष रणजित देसाई यांच्या एकांत रिसॉर्ट पिंगुळी येथे मान्यवर सर्वपक्षीय विविध संस्था प्रतिनिधी पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

अभिप्राय द्या..