सुनील कर्जतकर यांची वेंगुर्ले न.प.प्रकल्पाना भेट..

सुनील कर्जतकर यांची वेंगुर्ले न.प.प्रकल्पाना भेट..

वेंगुर्ला /-

भाजपा प्रदेश पदाधिकारी व निवडणूक संयोजन समिती महाराष्ट्र प्रभारी सुनील कर्जतकर यांनी आज वेंगुर्ले ना₹गरपरिषदेस भेट दिली.तसेच न.प.चे कलादालन,कंपोस्ट डेपो,चिल्डरन प्ले ग्राउंड,मल्टिपर्पज हॉल,मच्छिमार्केट आदींना भेट देऊन न.प.च्या सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले.वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी त्यांचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,भाजपचे राजू राऊळ,भाजप तालुकाध्यक्ष – नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे,धर्मराज कांबळी,नागेश गावडे,नगरसेविका साक्षी पेडणेकर, पूनम जाधव,श्रेया मयेकर आदी उपस्थित होते.यावेळी भाजपच्या कार्यकालात न.प.ला प्राप्त निधीचा न.प.ने चांगला विनियोग केल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.

अभिप्राय द्या..