विद्यार्थ्याने केली वर्गमित्राची गोळ्या घालून हत्या….

विद्यार्थ्याने केली वर्गमित्राची गोळ्या घालून हत्या….

बुलंदशहर: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये हादरवणारी घटना घडली. क्लासमध्ये बसण्यावरून भांडण झाल्यानंतर १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वर्गमित्राची गोळ्या घालून हत्या केली. गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली.
बुधवारी सकाळी दोन मुलांमध्ये क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून वाद झाला. गुरुवारी एका विद्यार्थ्याने त्याच्या काकांकडील पिस्तूल आणले आणि वर्गमित्रावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. आरोपी आणि मृत विद्यार्थी हे दोघेही १४ वर्षांचे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दोन्ही मुलांमध्ये क्लासमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. आरोपी घरी गेला आणि काकांचे पिस्तूल चोरले. गुरुवारी तो पुन्हा क्लासमध्ये आला आणि त्याने वर्गमित्रावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीने वर्गमित्रावर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या डोक्यावर आणि इतर दोन गोळ्या त्याच्या छातीवर आणि पोटावर घातल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी विद्यार्थ्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पहिल्या मजल्यावरील क्लासमधून तो तळमजल्यावर आला. त्यानंतर त्याने हवेत गोळीबार केला. त्याचवेळी काही शिक्षकांनी धाडस करून त्याच्या हातातील पिस्तूल हिसकावले आणि त्याला पकडले. पोलिसांनी त्याच्या बॅगमधून आणखी एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे.

अभिप्राय द्या..