आचरे गावचे सुपुत्र सुधीर कानविंदे यांचा दिल्लीत सत्कार

आचरे गावचे सुपुत्र सुधीर कानविंदे यांचा दिल्लीत सत्कार

एक्झाम्पलरी कॅटॅगरी मधील प्लॅटीनम अॅवाॅर्डने भारताच्या राष्ट्रपती कडून सन्मान
आचरा–
डिजिटल इंडिया मधील एक्झाम्पलरी कॅटॅगरी साठी सर्वोत्तम समजला जाणारा प्लॅटीनम पुरस्कार आचरा गावचे सुपुत्र सुधीर कानविंदे यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.भारतातील एकूण ४५०लोकांमधून सात प्रकारांमधून कानविंदे यांची भारत सरकार तर्फे
निवड केली गेली.त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुधीर धोंडदेव कानविंदे हे सध्या आयपीए मिनिस्ट्री ऑफ पोर्टस , शिपिंग मध्ये एक्झुक्यूटीव्ह डायरेक्टर ह्या पदावर कार्यरत आहेत.
भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे. भारताची आर्थिक सुधारणा होण्यासाठी सागरी बंदरे अत्याधुनिक होणे फार गरजेचे बनले आहे. आज ७० टक्के पेक्षा जास्त मालाची वाहतूक ही सागरी बंदरातून होते.
आपल्या देशाची बंदरे अत्याधुनिक असणे ही काळाची गरज ओळखून , त्याप्रमाणे सर्व बंदरे जोडण्याचे काम हे कानविंदे यांच्या
कार्यालया मार्फत फार जोरात सुरु करण्यात आले आहे. भारतात सागरी मार्गे माल वाहतूक करताना माल निर्मिती ते माल ग्राहकाला पोचवणे , ह्यात २७ वेळा कागद हाताळला जात होता . पण ते आता सर्व संगणकीय प्रणाली द्वारे करण्यात शिपींग मिनिस्ट्री ला यश आल्यामुळे वेळ तर वाचलाच आहे. शिवाय पैशांचीही खूप बचत होत आहे . आता हे सर्व व्यवहार , पारदर्शकतेने आणि संगणकाने होणार असल्याने कोरोना महामारीत एकमेकांशी होणारा थेट संपर्क तुटल्याने कोरोना संसर्गाचा धोका कमी झाला असल्याचे सुधिर कानविंदे फोन वरून बोलताना स्पष्ट केले.

कंटेनर शिप चा बंदरातील एक तास वाचला तर जवळ जवळ 80 हजार अमेरिकी डॉलर एवढी बचत होते, भरतातील लॉगिस्टिक कॉस्ट ही फार जास्त आहे त्याला आळा अश्या संगणकीय पद्धतीने घालता येउशाकतो त्यामुळे मालवाहतूक स्वस्त होईलच पण जो उत्पादक आहे त्याचा माल ग्राहकांना लवकर पोचवता येईल. तसेच शेतीमाल लवकर परदेशात पाठवल्याने शेती माल खराब होणे ही टाळता येवू शकतो या दृष्टीने कानविंदे यांच्या कार्यालयाकडून प्रयत्न केले जात आहेत.

ह्या सर्वांची दाखल घेत , डिजिटल इंडिया मधील , एक्झाम्पलरी कॅटॅगरी मधील प्लॅटिनम अवॉर्ड हा सर्वोत्तम पुरस्कार बुधवारी 30 डिसेंबर ला राष्ट्रपतींच्या हस्ते कानविंदे यांना देण्यात आला.

अजूनही बरेच उपक्रम आपल्या कार्यालयाने घेतले असल्याचे कानविंदे सांगतात. आपण कोकणातील असल्याने , सातशे कि मी लांबीच्या कोकण पट्टीतील छोटी बंदरे प्रवासी वाहतुकी साठी सुरु करण्यात आणि त्यायोगे रोजगार निर्माण करणे ह्यावर काम करण्याची आपली
इच्छा असल्याचे कानविंदे यांनी सांगितले आहे. आणि त्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार ला ते लवकरच प्रस्ताव देणार असल्याचे त्यांच्या कडून सांगण्यात आले. कानविंदे यांच्या या सन्मानाबद्धल रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी उपाध्यक्ष बाबाजी भिसळे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर यांसह सर्व समिती सदस्य कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..