कुडाळमध्ये भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घेतली भाजपा नेते आम.रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट..

कुडाळमध्ये भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घेतली भाजपा नेते आम.रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट..

आज सकाळी भाजपा नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांचे कुडाळ येथे आगमन झाले. त्यावेळी अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एमआयडीसी विश्रामगृहावर त्यांची सदिच्छा भेट घेत विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या निवडणुक रणनीतीतील कौशल्याचा व अनुभवाचा फायदा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवण्याच्या दृष्टीनेही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. भाजयुमो कुडाळ तालुकाध्यक्ष श्री रुपेश कानडे आणि श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे कुडाळमध्ये स्वागत केले.

चव्हाण यांच्या या भेटी दरम्यान यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री आनंद उर्फ भाई सावंत, जिल्हा कोषाध्यक्ष श्री चारुदत्त देसाई, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, कुडाळ महिला शहर अध्यक्षा सौ मृण्मयी उर्फ ममता धुरी, कुडाळ चिटणीस श्री राजेश पडते, जिल्हा बँक संचालक श्री प्रकाश मोर्ये, श्री निलेश तेंडुलकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य तथा माजी सभापती श्री मोहन सावंत, श्री वैभव शेणई, चेतन धुरी,श्री निलेश परब, युवा मोर्चाचे सुश्मित बांबुळकर, सोशल मीडिया जिल्हासंयोजक अविनाश पराडकर, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजवीर पाटील, आंबोली मंडल अध्यक्ष श्री संदिप गावडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..