कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगगुरूंची वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रास भेट

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगगुरूंची वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रास भेट

वेंगुर्ला
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेस भेट दिली. यावेळी केंद्रात चालू असलेल्या कृषी माहिती व प्रशिक्षण इमारतीची, आंबा, काजू, रोपवाटिकेची पाहणी केली.तसेच रोपवाटिका बळकटीकरण करीता प्राप्त अनुदानातून बांधलेल्या २० अर्धगोलाकार शेड व २ हाडलिंग शेडचे उदघाटन केले.संशोधन कामाचा आढावा घेवून त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. सावंत, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत,डॉ. एम. बी. दळवी. ए. वाय मुंज, डॉ. विजयकुमार दळवी, डॉ. एम. एस. गवाणकर, डॉ. आर. सी. गजभिये, डॉ. श्रीमती कदम, डॉ. श्रीमती देशमुख यांनी विविध संशोधनाबाबत माहिती दिली.

अभिप्राय द्या..