कोकिसरे येथे कॉलेज युवकाची आत्महत्या…

कोकिसरे येथे कॉलेज युवकाची आत्महत्या…

वैभववाडी:

कोकिसरे कुंभारवाडी येथील कॉलेज युवकाने आपल्या जीवाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. विनायक विजय कदम वय वर्षे 19 असे त्याचे नाव आहे .ही घटना 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या पूर्वी घडली. या घटनेची फिर्याद त्याचे चुलते संजय तुकाराम कदम वय 50 राहणार कोकिसरे कुंभारवाडी यानी वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये दिली.
विनायक विजय कदम हा वैभववाडीतील एका ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी मध्ये शिक्षण घेत होता. सोमवारी सकाळी आपल्या काकांना प्रात विधीला जातो असे सांगून तो घराच्या पाठीमागे च्या खोलीत जाऊन लोखंडी बारला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय वैभववाडी आणले. वैद्यकीय अधिकारी यांनी शव विच्छेदन केले त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दुपारी कोकिसरे येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात चुलते आहेत.

अभिप्राय द्या..