निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम सुरू करा,यासाठी निवती ग्रामस्थांचे कुडाळ येथे आमरण उपोषण सुरू

निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम सुरू करा,यासाठी निवती ग्रामस्थांचे कुडाळ येथे आमरण उपोषण सुरू

कुडाळ /-

निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम सुरू करा,ठेकेदार काम करत नाही संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाका,असे सांगत आज २९डिसेंबर रोजी निवती येथील १००ते १५० निवती ग्रामस्थांनी ,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांच्या कुडाळ येथील मुख्य कार्यालयात उपोषण सुरू केले आहे.निवती ग्रामस्थांनी मागील आठ दिवसापूर्वी उपोषणाचा दिला ईशारा दिला होता परंतु याकडे ठेकेदार व अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने आज आम्ही निवती ग्रामस उपोषणाला बसलो आहोत,गावातील बऱ्याच लोकांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन हे या उपोषणाला सहभाग घेतला आहे,असे निवती ग्रामस्थ यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

उपोषण स्थळी कार्यकारी अभियंता श्री.ए .जे .पाटील ,शाखा अभियंता श्री.मेस्त्री यांच्याशी उपोषणकर्त्यांची चर्चा सुरू आहे.अजून कोणत्याही तोडगा झाला नसल्याचे समजते,उपोषण चीगळण्याची शक्यता आहे.कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ ऑफिस समोर पोलीस,होमगार्ड यांची तैनात ठेवली आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निवती रस्त्याचे बंद आवस्तेतील काम सुरू करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असा ईशारा निवती येथिल ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्हा कार्यालयाला भेट देत २१ डिसेंबर रोजी कुडाळ येथील मुख्य कार्यकारी अभियंता श्री.ए .जे .पाटील यांना निवती ग्रामस्थांनी निवेदन देत काम बंद असलेल्या रस्त्या संदर्भात चर्चा केली होती.मात्र या चर्चे दरम्यान कोणतेही काम संबधीत ठेकेदाराने सुरू नकेल्याने आज मंगळवार दिनांक २९ डिसेंबर २०२० रोजी निवती ग्रामस्थ हे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कुडाळ येथील जिल्हा ऑफिस समोर निवती येथील १०० ते १५० ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना या कार्यालयात मोर्चा काढत आज उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला प्रामुख्याने किशोर सारंग ,तृप्ती कांबळी ,विलास आरोलकर, लक्षुमन नाईक,उदय सारंग ,सुरेश पडते ,कांचन पाटकर,अनिल मेतर ,वीरश्री मेंतर ,निलेश मस्त,नागेश सारंग ,भारती धुरी,अजित खवणेकर ,सुधीर मेतर ,रामचंद्र भगत ,नमिता घाटवळ हे सर्व निवती ग्रामस्थ व त्याशिवाय अन्य ग्रामस्थ हे आज कुडाळ येथील पंतप्रधान ग्रामसडक जोजनेच्या ऑफिस समोर उपोषण स्थळी हजर आहेत.

अभिप्राय द्या..