रणजित देसाईंवर बोलण्याअगोदर निविदा प्रक्रिया करायला शिका,नळयोजन पंधरा दिवस बंद ठेवून घाणेरडं राजकारण करणाऱ्या भडगाव सरपंच उपसरपंच यांना रणजित देसाईंवर बोलण्याचा अधिकार नाही:भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा सदस्य योगेश घाडी यांनी गुरव यांच्यावर पलटवार केला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेल्या रणजित देसाईंवर बोलण्याअगोदर टेंडर प्रक्रिया करायची माहिती घ्या. ग्रामपंचायत सुशोभीकरण प्रकरणार चौकशी अधिकाऱ्यांनी अनियमिततेचा मारलेला शेरा तुमचं प्रशाकीय ज्ञान किती आहे ते दाखवण्यासाठी पुरेसा आहे. आणि आमदार वैभव नाईकांनी भडगाव मध्ये १ कोटीची काम केली हे सांगण्या अगोदर पाच वर्षापूर्वी ज्या कामांची भूमिपूजन केली त्याच काय झालं याच उत्तर द्या. गावातील ग्रामपंचायतीची नळयोजन पंधरा पंधरा दिवस बंद ठेवून घाणेरडं राजकारण करणाऱ्या भडगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांना रणजित देसाईंवर बोलण्याचा अधिकार नाही. लवकरच ग्रामपंचायतची संपूर्ण चौकशी लावून गेल्या तीन वर्षांतील भ्रष्टाचार बाहेर काढणार भाजप युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा सदस्य योगेश घाडी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page