माणगाव येथील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्याशी चुकीचे वर्तन केल्या प्रकरणी प्रणित आडेलकर याच्यावर पाॅस्को अंतर्गत  अंतर्गत गुन्हा दाखल..

माणगाव येथील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्याशी चुकीचे वर्तन केल्या प्रकरणी प्रणित आडेलकर याच्यावर पाॅस्को अंतर्गत  अंतर्गत गुन्हा दाखल..

कुडाळ /-

अल्पवयीन मुलगी अज्ञान असल्याचे माहित असूनही तिचा छुपा पाठलाग करत तिच्याशी चुकीचे वर्तन करण्याचा प्रयत्न करत तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माणगांव मळावाडी येथील प्रणित प्रकाश आडेलकर ३५ याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अल्पवयीन मुलगी माणगांव परिसरातून पायी चालत असताना तिच्या मागोमाग जाऊन या युवकाने तिचा छुपा पाठलाग केला व तिच्याशी चुकीचे वर्तन केले.आणि तिच्याशी लाजास्पद वागणूक केल्या प्रकरणी व त्या मुलीच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कुडाळ पोलीस स्टेशनमद्धे मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे. संबंधित युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीम यादव करत आहेत.या घटनेत संबंधितावर बालकांचे लैगिंग अत्याचार पासून संरक्षण कायदा पाॅस्को अंतर्गत तसेच भादवि कलम ३५४ ड (२),५०४ ,५०६, ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

अभिप्राय द्या..