सिंधुदुर्गनगरी,/-

चर्मकार समाजाच्या भवनासाठी माझा आमदार निधी दिला जाईल समाजाचे प्रलंबित प्रश्न लवकर सोडविले जातील असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी आज भारतीय चर्मकार समाजाच्या भव्य स्नेहमेळावा व सत्कार सोहळ्यात आज ओरोस येथे केले समाजाच्या विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्याचा गौरव सोहळा महिलांचा गौरव सोहळा मोफत आरोग्य शिबीर विविध पुरस्कारप्राप्त यांचा सन्मान आदी भरगच्च सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र संघटनेला ३४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संत शिरोमणी रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, विद्यार्थी सन्मान व विशेष सन्मान सोहळा तसेच मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांचे अध्यक्षतेखाली श्री रवळनाथ मंदिर रंगमंच, ओरोस येथे आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन आमदार वैभव नाईक शिवसेना युवा नेते संदेश पारकर, भारतीय चर्मकार समाज राज्य अध्यक्ष, पंढरी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी तानाजी परब. अरुण होडावडेकर बाबा गवळी जिल्हाअध्यक्ष बाबल नांदोसकर राज्य उपादक्ष चंद्रकांत चव्हाण कार्याध्यक्ष अनिल चव्हाण सुरेश चौकेकर, उद्योजक बाबल पावसकर, विनायक कोडल्याळ, स्नेहा दळवी, विश्वनाथ चव्हाण, भारत पेंडुरकर, सी आर चव्हाण, मालिनी चव्हाण, प्राजक्त चव्हाण, डॉ प्रतीक्षा चव्हाण, सहदेव चव्हाण, रघुनाथ चव्हाण, मंगेश चव्हाण, अंकुश चव्हाण, सहदेव चव्हाण, केशव पिंगुळकर गणेश चव्हाण संजय कुडाळकर तुळशीदास पवार प्रभाकर चव्हाण नंदकिशोर तेंडोलकर उमेश चव्हाण केशव चव्हाण प्रशांत तेंडुलकर गणपत चव्हाण रमेश कुडाळकर श्याम चव्हाण सत्यवान खोटलेकर अनिल जाधव प्रथमेश नांदोसकर सुनील रेडकर मिलिंद होडावडेकर सुनील केळकर डॉ जगदीश्वर तेडोलकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई कोल्हापूर रत्नगिरी पालघर आदी भागातून समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होता विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page