संपदा कदम या महिलेचे कुडाळ रेल्वे स्थानकातून अज्ञात चोरट्याने केले सोन्याचे दागिने लांप्पास..

संपदा कदम या महिलेचे कुडाळ रेल्वे स्थानकातून अज्ञात चोरट्याने केले सोन्याचे दागिने लांप्पास..

 

कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल..

कुडाळ /-

मुंबई ते कुडाळ असा प्रवास करताना मुंबईतील महिला संपदा शैलेश कदम यांचा ४५ हजाराचा सोन्याचा मुहुर्तमणी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही महिला रात्री ठाणे येथे तुतारी एक्सप्रेसमध्ये बसली होती. यानंतर ती कुडाळ येथे रविवारी उतरली. यावेळी प्लॅटफॉर्मवर खूप गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने या महिलेच्या गळ्यातील १५ ग्रँम वजनाचा ४५ हजार रू किंमतीचा सोन्याचा मुहूर्तमणी चोरून नेला. या प्रकरणी या महिलेने कुडाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास एस.आय श्री माने करत आहेत.

अभिप्राय द्या..