कुडाळ येथील अल्पवयीन मुलगी पोहचली सांगली जिल्ह्यात.;इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून प्रेमात रूपांतर

कुडाळ येथील अल्पवयीन मुलगी पोहचली सांगली जिल्ह्यात.;इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून प्रेमात रूपांतर

 

कुडाळ पोलिसांनी घेतले दोघांनाही ताब्यात..

कुडाळ /-

सांगली जिल्ह्यातील येथील एका मुलाशी इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून व घरातील किरकोळ वादातून कुडाळ तालुक्यातील एक अल्पवयीन मुलीने सांगली गाठली या मुलीला सांगली तासगांव गौरगांव येथून कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.कुडाळ तालुक्यातून ही अल्पवयीन मुलगी २३ नोव्हेंबर पासून बेपत्ता होती. तिचा शोध घेऊनही तिचा कोणताच पत्ता लागला नव्हता.दरम्यान ती सांगली तासगांव गौरगांव येथील संबंधित युवकाच्या आजीच्या घरी असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना तपासात मिळाली, यावरून कुडाळ पोलिस मंगेश जाधव, स्वप्नील तांबे ,महिला पोलीस सारिका बांदेकर, यांनी या मुलीला काल रात्री उशिरा या मुलासह ताब्यात घेतले व त्यातील मुलीला बालकल्याण समिती समोर हजर केल्यावर तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

अभिप्राय द्या..