सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी…भारत सरकारची योजना…

सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी…भारत सरकारची योजना…

मुंबई : सॉवरेन गोल्ड बॉन्डची नवी सिरीज येत्या 28 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या योजनेच्याअंतर्गत सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 5 हजार रुपये असेल. आपणास नवीन वर्षात सोने खरेदी करायचे असेल तर ही आपल्यासाठी खास संधी असेल.

भारत सरकारची ही योजना असून त्याशिवाय आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करु शकता.

भारत सरकारच्या वतीने, रिझर्व्ह बॅंक प्रत्येक वर्षी सोने खरेदीचे समतुल्य मानले जाणारे सोन्याचे बंध जारी करतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सरकारकडून आपण कमी किमतीला सोने खरेदी करतो. परंतु सरकार सोन्याऐवजी आपल्याला तेवढ्याच किमतीचे रोखे देते . या योजनेत आपण कमीत कमीत आठ वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतो. यानंतर गुंतवणूक केलेले पैसे आपल्याला एकाच वेळी मिळतात. वास्तविक सोन्याच्या मागणीला कमी करुन ती गुंतवणूक रोख्यांमध्ये करणं, यापाठीमागचा उद्देश आहे.

आपल्याला या योजनेअंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी एक ग्रॅम सोने खरेदी करावं लागेल. तसंच जास्तीत जास्त आपण 4 किलो सोने खरेदी करु शकता. आपण आपल्या मुलांच्या नावाने देखील या योजनेत गुंतवणूक करु शकतो.

बाजाराच्या किमतीपेक्षा स्वस्त सोने
या योजनेअंतर्गत सध्याची सोन्याची किंमत 5 हजार रुपये प्रति ग्रॅम केलेली आहे. सध्याची सोन्याची बाजारातील किंमत 10 ग्रॅमसाठी 51 हजार 785 रुपये एवढी आहे. यावरुन या योजनेतून सोने खरेदी करणं फायदेशीर असल्याचं दिसून येतं.

अभिप्राय द्या..