प्रसाद घाडी यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने मरणोत्तर सन्मान

प्रसाद घाडी यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्काराने मरणोत्तर सन्मान

मसुरे 

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पुरस्काराने मुणगे येथील कै. प्रसाद नागेश घाडी याना सन्मानीत करण्यात आले. केंद्र शासनाचा बालश्री पुरस्कार प्राप्त व दिव्यांग असलेल्या प्रसादची सदर रेकाॅर्डबूक मध्ये दोन विभागासाठी निवड झाली आहे. अल्प आयुष्यातील प्रेरणादायी कामगिरीची ११० आर्टीकल प्रसिद्धी आणि बहुविकलांग असूनही ३० सन्मान आणि १७ विविध पुरस्कार त्याने प्राप्त केले होते.
या पुरस्कारामुळे प्रसादच्या चित्रकला व पेंटीग या कलेची सर्वाना ओळख झाली होती. सदर रेकॉर्डमध्ये नाव येण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पुर्तता संजिवनी मोरे व सुरज सावंत यानी केली होती. प्रसादच्या जिवनावरील ‘पंखाविना भरारी’ हे पुस्तक अनेक दिव्यांगाना मार्गदर्शक ठरत आहे. जबरदस्त इच्छा शक्तिच्या जोरावर त्याने विविध शिखरे प्राप्त केली होती. पद्म पुरस्काराच्या तोडीचा बालश्री पुरस्कार प्रसादने राष्ट्रपती भवन येथे स्विकारला होता. फक्त एकवीस वर्षे जीवन जगलेल्या प्रसादने या कालावधीत आपल्या कर्तुत्वाने अनेक पुरस्कार मिळवून अनेक दिव्यांगाना प्रेरणा दिली होती.
प्रसाद आज आपल्यात नसूनही इंडिया बूक रेकाॅर्ड दिल्ली यांनी गोल्डमेडल, प्रमाणपत्र देवून त्याच्या या कर्तृत्वाची नोंद घेतली हे पहाता प्रसाद आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो या प्रेरणेने सर्वांसाठी अमर आहे. प्रसादची ही प्रेरणा शाळाशाळांमध्ये आत्ता पोहचण्याची खरी गरज आहे .अशी भावना प्रसादची आई समाजसेविका सौ. शरयु घाडी यानी व्यक्त केली आहे.

अभिप्राय द्या..