कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. कुडाळ पंचायतसमिती समोरील पाण्याची मेन पाइपलाइन फोडली, शिवाजीनगर येथील नळ कनेक्शन, मेन लाइन फोडली त्यावेळी ठेकेदाराला समज दिली.ह्यापूर्वी सुद्धा समज दिली होती.परंतु ठेकेदाराची मनमानी सुरूच आहे.आज सकाळी अभिनवनगर येथे गॅस पाइपलाइन खोदाईचे काम स्थानिक नगरसेवकांना कल्पना न देताच सुरू केले.

खोदाई झाल्यानंतर पाइप टाकल्यानंतर तो खड्डा बुजवताना पाणी मारून खड्डा भरला पाहिजे तश्या सूचनाही ठेकेदाराला दिल्या होत्या. परंतु याकडे पूर्ण डोळेझाक करत आहे. याकडे नगरपंचायतही दुर्लक्ष करत आहे.शिवाजीनगर येथे तर धुळीचे साम्राज्य झालेले आहे. पाणी मारून खड्डे न बुजविल्यामुळे पावसाळ्यामध्ये त्याठिकाणी नवीन गटर तयार होणार आहे.आता पर्यंत ज्या,,ज्या,,ठिकाणी खोदाई केलेली आहे त्या त्या ठिकाणची अर्धी माती काढून पाणी मारले पाहिजे.व परत पूर्ण माती भरून परत पाणी मारली पाहिजे. अन्यथा पावसाळ्यामध्ये त्याठिकाणी वाहने रूतू शकतात.याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो,असे असे शिवसेनेचे संजय भोगटे यांनी मिडियाशी बोलताना सांगितले. यावेळी नगरसेवक गणेश भोगटे, नगरसेविका सौ मेघा सुकी, राजा पडते, चेतन मंडोलकर, अमित सुकी, तुषार भानुशाली, प्रभू, घनश्याम शिरसेकर तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page