मसुरेच्या स्नेहा परब कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित!;

मसुरेच्या स्नेहा परब कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित!;

मुंबई उपमहापौर यांच्या हस्ते म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने सत्कार

मसुरे

मसुरे चांदेरवाडी येथील सौ. स्रेहा संदिप परब यांना कांदिवली मुंबई येथे उप महापौर सुहास वाडकर यांच्या हस्ते कोवीड योद्धा म्हणुन सन्मानीत करण्यात आले. कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( शताब्दी) रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणुन गेली सोळा वर्षे त्या कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात या रुग्णालयातील रक्तपेढीद्वारे रक्तदान शिबिर आयोजीत करुन रक्त संकलनाचे कार्य केले होते. त्यामुळे गरीब व गरजु रुग्णाना रक्त पुरवठा नियमीत करता आला. तसेच संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करुन वेळेत अहवाल देण्यासाठी महत्वाची भुमीका त्यांनी बजावली होती. कोरोनाच्या भयावह परिस्थितीत स्नेहा परब यानी बजावलेल्या कामगीरी बद्दल म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना यांच्या वतीने कोरोना योद्धा हे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस सत्यवान जावकर, सरचिटणीस अ‍ॅड. रचना अग्रवाल आदि मान्यवर ऊपस्थित होते.

अभिप्राय द्या..