वैभववाडी /-
करूळ घाट मार्गा मधून कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करताना लक्झरी बस करूळ घाटातील सूर्यास्त पॉईंट येथील अवजड वळणावरून चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस मागे येऊन मागाहून येणाऱ्या इसुजू कारच्या दर्शनी भागाचे व लक्झरी ट्रॅव्हल्सच्या मागच्या भागाचे असे दोन्ही गाड्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत लक्झरी बस चालक त्याच्याविरोधात वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही घटना 22 नोव्हेंबर रोजी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 :20 वाजण्याच्या सुमास घडली.
करुळ घाट मार्गे लक्झरी बस पुण्याच्या दिशेने जात असताना लक्झरी बस क्रमांक एम एच 43,एच. 14 94 चा बस चालक शंकर कारभारी मगर वय 36 रा.मजलेशहर ता. शेगाव जि. अहमदनगर हे करूळ घाटाच्या सूर्यास्त पॉईंट येथील अवघड वळणावर आली असता चालकाचा बस वरील ताबा सुटून बस मागे आल्याने मागाहून कोल्हापूर च्या दिशेने जाण्याऱ्या इसुझु कार एम. एच. 14 ,एच .क्यू . 20 19 कराच्या दर्शनी भागाचे व लक्झरी बस अशा दोन्ही वाहनांचे हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार विलास राठोड यांनी यांनी वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये दिले आहे .त्या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर करत आहेत.