भाजपा वैभववाडी शहर पक्षनिरीक्षक पदी राजन चिके यांची निवड.

भाजपा वैभववाडी शहर पक्षनिरीक्षक पदी राजन चिके यांची निवड.

 

वैभववाडी :
भाजपा वैभववाडी नगरपंचायत (शहर) कार्यक्षेत्र पक्षनिरीक्षक पदी राजन चिके यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे यांनी त्यांची निवड जाहीर केली आहे. आमदार नितेश राणे यांनी नियुक्ती पत्र श्री. चिके यांना दिले आहे. वैभववाडी भाजपच्यावतीने श्री. चिके यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन होत आहे.
श्री. राजन चिके कणकवली तालुक्यातील फोंडाघाटचे रहिवासी आहेत. फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये त्यांनी पाच वर्ष सरपंच तर पाच वर्ष उपसरपंच पदाचा कार्यकाल सांभाळला. सन 1989 पासून ते भाजपा पक्षाचे सक्रिय कार्यरत आहेत. भाजपा कणकवली तालुका मंडळ अध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले आहे. पक्षाचे निष्ठावंत व प्रामाणिक पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या पक्षनिरीक्षक निवडीमुळे वैभववाडी शहरात भाजपा पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे. चिके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..