हातकणंगले तालूक्यातील नरंदे येथे सन्मान महिला कलागुणांचा ऑनलाईन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर /-

नरंदे( ता. हातकणंगले ) येथील जीत मल्टिपर्पज फौंडेशन, डॉ. मिलिंद हिरवे फौंडेशन, पेठ वडगांव, सोना महिला बचत गट व जागृती महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने “सन्मान महिला कलागुणांचा २०२०” ही ऑनलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्रीयन वेशभूषा, मी अँड मॉम,फॅन्सी ड्रेस, उखाणा स्पर्धा, १३ वर्षांवरील मुलींसाठी फॅशन शो आणि सेल्फी विथ फॅमिली आणि या स्पर्धांचा समावेश होता.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, सातारा, सांगली आणि कोल्हापूर मधून २०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. शैला तावरे व डॉ. सौ. स्मिता गिरी यांचे सहकार्य लाभले. डॉ. राजेंद्र पाटील, श्री. भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. पल्लवी पाटील, सौ. अर्चना पाटील, सौ. उषा पाटील, सौ. अमृता पाटील व श्री. महेश मोहिते यांनी या स्पर्धेचे नियोजन केले. पारितोषिक वितरण सोहळा विजेते आणि आयोजकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंग चे पालन करून उत्साहात पार पडला.*
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोशल डिस्टनिंग पाळत उत्स्फूर्तपणे पार पडला या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
१३ वर्षांवरील मुलींचा फॅशन शो
प्रणाली प्रकाश मोरे- प्रथम क्रमांक
प्राची युवराज पाटील- द्वितीय क्रमांक
विभा कृष्णराज शिंदे- तृतीय क्रमांक
अक्षरा सचिन राणे पाटील -तृतीय क्रमांक
उखाणा स्पर्धा
वनिता राहुल पाटील – प्रथम क्रमांक
प्रगती सौरभ हेरवाडे -द्वितीय क्रमांक
शालन प्रमोद पाटील – द्वितीय क्रमांक
निशा सचिन हिप्परकर- तृतीय क्रमांक
महाराष्ट्रीयन वेशभूषा
नुपुरा शेरसिंग पवार -प्रथम
ज्ञानदा संदीप मोहिते- द्वितीय क्रमांक
प्राजक्ता भानुदास पाटील -द्वितीय क्रमांक
अल्फा दिलीप भंडारी- तृतीय क्रमांक
छाया दिलीप गुळमुदे -तृतीय क्रमांक
मी अँड मॉम फॅन्सी ड्रेस
दिपाली विजय गुळमुदे- प्रथम क्रमांक
सविता नागेश भंडारी- द्वितीय क्रमांक
भाग्यश्री संदीप मोहिते -तृतीय क्रमांक
सेल्फी विथ फॅमिली
निशा सचिन हिप्परकर- प्रथम क्रमांक
स्मिता सुरेश गिरी -द्वितीय क्रमांक
शालन प्रमोद पाटील- तृतीय क्रमांक
सारिका राजाराम कागले-तृतीय क्रमांक
रेश्मा महेंद्र वाघमारे-तृतीय क्रमांक
यावेळी जीत फाउंडेशन चे राजेंद्र पाटील, भगवान पाटील , महेश मोहिते, पल्लवी पाटील, उषा पाटील , अमृता पाटील, अर्चना पाटील यासह स्पर्धक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..