कोल्हापूर

कुरुकली( ता करवीर) येथील शेतात म्हैशी जाऊन नुकसान झाल्याचे रागातून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तरूणाचा धारदार हत्याराने निर्घून खून करण्यात आला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार काशिनाथ साताप्पा पाटील (वय ३०) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.संशयित किरण हिंदूराव पाटील याने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी काशिनाथ यांच्या कुटूंबातील जनावरे चुकून किरण याच्या शेतात गेली होती.त्यावेळी त्यांनी त्यांचे हत्ती गवत खाल्ले होते.याचा जाब विचारण्यासाठी दारात गेलेल्या किरणला मारहाण झाल्याचे समजते.त्यामुळे दोन्ही कुटूंबात वाद निर्माण झाला होता.यावेळी झालेल्या भांडणावेळी मृत काशिनाथ याने किरणची गळपट्टी धरल्याचेही समजले. आज पहाटे कौलव ता राधानगरी येथील आजोळी आजोबांचे अंत्यसंस्कार करून काशिनाथ नुकताच परत गावी आला होता.त्यानंतर तो शेताकडे फेरी मारण्यासाठी मोटारसायकल वरुन गेला होता.त्याच रागातून किरणने मोटारसायकल वरुन पाठीमागून येऊन ऊसतोड करण्यासाठी वापरणाऱ्या कोयत्याने मानेवर सपासप वार करुन काशिनाथचा खून केल्याचे समजते.

सकाळी पावणेदहाच्या दरम्यान हा खूऩ झाला असून कुरूकली कॉलेज रोडवरील रिकवेस्ट स्टॉपवर ही घटना घडली आहे. घटनास्थळी करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर””हवालदार के ङी माने यांच्यासह पोलिस गावात दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page