आत्महत्येचा प्रयत्न फसला;मृत्यूला लागला ब्रेक

आत्महत्येचा प्रयत्न फसला;मृत्यूला लागला ब्रेक

मुंबई:बदलापूरहून मुंबईच्या दिशेला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जाणारी लोकल ट्रेन अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ येत असता या लोकल ट्रेन समोर एक व्यक्ती रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी अगोदरच झोपला होता.

हा प्रकार लोकल मोटरमनच्या लक्षात आला. मोटरमनने सावधानता बाळगत वेळीच लोकलला ब्रेक लावले. त्यावेळी गाडी रुळावर झोपलेल्या व्यक्तीच्या एक ते दीड फूट अंतरावर जाऊन थांबली आणि या इसमाचा जीव वाचला. या माणसाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने लोहमार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.या सर्व प्रकाराने तिथे असणाऱ्या प्रवाशांचा थरकाप उडाला.

अभिप्राय द्या..