अंजनगाव सुर्जी तालुक्यात एका शेतकऱ्यांने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली असून त्यात महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव लिहिण्यात आले आहे. शेतकऱ्याने संत्रा विक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाल्याने महाराष्ट्र राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने न्याय मिळण्याकरिता अखेरची चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचे सांगितले.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनेगाव येथील शेतकरी अशोक भुयार (५५) याने आपल्या शेतातील संत्र्याचा बार अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकला होता. सदर शेतकऱ्याला व्यापाऱ्यांनी शेतामध्ये जबरदस्तीने मद्यप्राशन करुन त्यांना पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेऊन शेतकऱ्याला मारहाण केली. त्याबाबतची तक्रार देण्यास धनेगाव येथील पोलीस पाटील आणि सदर शेतकरी अशोक भुयार हे अंजनगाव पोलीस स्टेशनला गेले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव लिहित ‘आपली संत्रा विक्रीच्या प्रकरणात फसवणूक झाल्याने आपल्याला न्याय मिळवून द्या’, असे त्यात म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page