माणगावात आज झाला भात खरेदी केंद्राचा शुभारंभ..

माणगावात आज झाला भात खरेदी केंद्राचा शुभारंभ..

 

सरपंच जोसेफ डांन्टस यानी श्री फळ वाढवून केले उद्घाटन..

कुडाळ /-

कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने माणग खो-यातील शेतक-याच्या भात खरेदी केंद्राचा आज माणगाव बाली नानचे याच्या घरी शुभारंभ करण्यात आला.दर गुरूवारी व शुक्रवारी भात खरेदी केले जाणार असल्याचे सांगितले.तसेच शेतक-यांनी योग्य ती कागदपत्रे कुडाळ खरेदी विक्री संघ येथे जमा करावी त्याच वेळी त्यांना दिली जाणार खरेदीची तारीख-नंदकीशोर करावडे यांनी सांगितले.यासाठी जास्तीत जास्त शेतकरांनी लाभ घेण्याचे सरपंच जोसेफ डांन्टस यानी आवाहन केले आहे.यावेळी सरपंच जोसेफ डांन्टस, माणगाव सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत गावडे, माजी उपसरपंच सचिन परब, विठोबा पालव,आबा केसरकर,मॅनीजर नंदकिशोर करवडे,खरेदी विक्री संघाचे कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..