जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचे यश

जिल्हास्तरीय निंबध स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचे यश

वेंगुर्ला

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोकण विभाग सिंधुदुर्ग व राजापुर को. आँपरेटिव्ह बँक वैभववाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यात इयत्ता अकरावी बारावी या उच्चमाध्यमिक गटात नेमळे पंचक्रोशी विद्यालयातील उच्चमाध्यमिक विभागातील आशिया सांगावकर हिने जिल्ह्यात प्रथम तर दिक्षा जाधव हिने दुसरा क्रमांक मिळविला. आणि उत्तेजनार्थ नंबर याच विद्यालयातील हर्षदा वेंगुर्लेकर हिला मिळाला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रा.वैभव खानोलकर यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक प्रा.वैभव खानोलकर आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या प्राचार्या बोवलेकर व चेअरमन राऊळ यानी विशेष अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..