रुपेश पावसकर यांचे खंदे समर्थक युवा भंडारी मालवण तालुका अध्यक्ष वासुदेव पावसकर शिवसेनेत दाखल..

मालवण /-

सिंधुदुर्ग शेतकरी लाकूड व्यावसायिक संघाचे अध्यक्ष तथा गोळवण कुमामे येथील सामाजिक कार्यकर्ते वासुदेव पावसकर ,माजी जी. प सदस्या सपना पावसकर व अन्य ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे यावेळी वासुदेव पावसकर यांनी सांगितले. रुपेश पावसकर यांचे खंदे समर्थक युवा भंडारी मालवण तालुका अध्यक्ष वासुदेव पावसकर यांनी अमित वेंगुर्लेकर यांच्या पाठोपाठ आता वासुदेव पावसकर यांनीही शिवसेनेत प्रवेश करत शिवधनुष्य हाती घेतला आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून वासुदेव पावसकर यांच्या निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. आमदार वैभव नाईक यांनी प्रवेश कर्त्यांना शिवबंधन बांधून गळ्यात पक्षाच्या शाली घालून पक्षात स्वागत केले. यावेळी वासुदेव पावसकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

वासुदेव पावसकर हे सिंधुदुर्ग शेतकरी लाकूड व्यावसायिक संघाचे अध्यक्ष असून त्यांच्या पत्नी सपना पावसकर यांनी जिल्हा परिषद सदस्य पद आणि महिला बालकल्याण सभापती पद भूषविले आहे. यावेळी कुमामे येथील ग्रामस्थ संजय माने, गणपत माने, श्रेयस पावसकर, शंकर जगताप, जनार्दन कुंभार, विलास कुंभार, मंगेश कुंभार, प्रदीप पावसकर, प्रकाश खोत, सिद्धार्थ पावसकर, निखिल पावसकर, दर्गेश मांजेरकर, मनोहर धुरी, विजय वराडकर, पक्या माने, अनिल गावकर, अनिता गावकर, शामसुंदर लाड, अनिता घाडीगावकर, नाना मालवणकर, संतोषी मालंडकर, हरिश्चंद्र माने आदींनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी, पंकज वर्दम, बाळा महाभोज, विजय पालव,भाऊ चव्हाण अमित भोगले दर्शन म्हाडगूत, अण्णा गुराम , बाबू टेंबुलकर,नाना नेरकर,श्वेता सावंत डॉ. सावंत, प्रज्ञा चव्हाण, विनोद सावंत आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page