कुडाळ बाजारपेठेत मनसे कार्यकर्ते व त्यांच्या सहकारी शिवप्रेमी संघटनेने पकडलेला गांजा प्रकरण दडपले जाण्याचा संभाव्य धोका!आहे. याचा कारणास्तव ,कुडाळ येथील गांजा तपास प्रकरण पणजी येथील नार्कोटींग कट्रोल ब्युरो (N.C.B.) कडे सोपविणे अत्यावश्यक !आहे असे माजी नगरसेवक तथा सामजिक कार्यकर्ते सुनील पेडणेकर यांनी आपल्या आपली प्रसिद्धि पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.मनसे नेते माजी आमदार परक्षुराम उपरकर यांनी याप्रकरणी गंभीरपणे लक्ष घालावा! असे त्यांनी सांगितले.
या निवेदनात सुनील पेडणेकर यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांनवर लक्ष केले आहे ते पुढीलप्रमाणे आहेत…
•सिंधुदुर्ग जिल्ह्यात गून्हे अन्वेशन विभाग या गुप्तचर यंत्रणेला गांजा तस्करीची माहीती असतानाही कारवाई का करत नाही?
•सावंतवाडीत यापूर्वी दोन काँलेज तरुणींकडून माजी महीला नगराध्यक्षानी अमली पदार्थ हस्तगत करुनही पोलिस यंत्रणा कोमात? आहे.
•अमली पदार्थाच्या तस्करांशी हप्तेखोर पोलिस अधिकाऱ्यांचे हीतसंबध असल्याची जनतेला आहे संशय?
•अमली पदार्थाच्या तस्करांशी हीतसंबध असलेल्या हप्तेखोर अधिकाऱ्यांना मिळाले प्रमोशन?
•जिल्ह्यातील पोलिस गुप्तचर यंत्रणेला गांजा अमली पदार्थ सापडत नाही तो मनसे कार्यकर्ते नागरिक स्थानिक संघटना लोकप्रतिनिधीना कसा काय सापडतो?
•गुन्हा अन्वेशन विभागाचे अधिकारी आणि अमली पदार्थ तस्करीचे हीतसंबध जुळल्याचा जनतेमध्ये आहे संशय?
•सिंधुदुर्ग जिल्ह्यात उघडपणे हप्तेखोरी सुरु असल्याने कुडाळ येथे भर बुधवारच्या बाजारापेठेत पकडलेला गांजा प्रकरण पोलिसांमार्फत योग्य प्रकारे हाताळले जाईल कींवा नाही याबाबत सांशकता आहे.
कुडाळ बाजारपेठेत मिळालेले गांजा प्रकरणात गांजा पकडून दिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असताना जिल्ह्यात राजकीय पक्ष कसल्या सामाजिक प्रश्नांची उत्तरे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना विचारणार आहेत गांजासारख्या गंभीर प्रकरणात आजीमाजी पालकमंत्री आजी माजी आमदार खासदार गांजा पकडून दिलेल्या तरुण कार्यकर्त्यांना धमक्या देऊनही कुणासाठी आणि का गप्प हे सहन करीत आहेत.मनसेसारखा एखादा अपवाद वगळला तर जिल्ह्यात गांजा चरस सारख्या अमली पदार्थाच्या तस्करीला जिल्ह्यातील राजकीय पक्षांचा मूक पाठींबा आहे का? त्यामुळे सत्य न्यायव्यवस्थे समोर येण्यासाठी जिल्ह्यात हप्तेखोर अधिकारी गांजा प्रकरण दडपण्याचा संशय असल्यामुळे कुडाळ येथील गांजा प्रकरण नार्कोटींग कट्रोल ब्युरो (N.C.B.) पणजी गोवा यांचेकडे सोपविल्यास हप्तेखोर अधिकारी,संशयित हीतसंबध उघड करण्यास मदत होईल व जिल्ह्यातील गांजा चरस आदी अमली पदार्थाच्या तस्करीची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाळेमुळे उखडली जातील हे निश्चित!असे सामजिक कार्यकर्ते सुनील पेडणेकर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.