चिंदर येथे देवालयाच्या प्रवेशद्वाराचे उदघाटन

चिंदर येथे देवालयाच्या प्रवेशद्वाराचे उदघाटन

मसुरे

मालवण तालुक्यातील चिंदर अपराजवाडी येथील श्री वाडात्री ब्राम्हण देवालयाच्या प्रवेशद्वाराचे उदघाटन चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक श्री विकास हडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
चिंदर अपराजवाडी येथील श्री वाडात्री ब्राम्हण देवालयाच्या प्रवेशद्वाराचे काम नुकतेच पूर्ण झाले. येथील अपराजवाडी आणि कोंडवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे उदघाटन येथील उद्योजक श्री विकास हडकर यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सीचे पालन करीत करण्यात आले. यावेळी मानकरी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..